बी. एड. ला हे कुठं शिकवलं जातं ? आम्हाला मानसशास्त्र शिकवणाऱ्या बाई तारस्वरात ओरडत शिकवायच्या, त्यावेळी त्यांच्या पोटात बाळ वाढत होतं, तरी त्यांना बालमानसशास्त्र (आमचं आणि त्या येणाऱ्या बाळाचं) कळलंच नाही. मुलं म्हणजे थॉर्नडाईकची मांजर किंवा पॅवलॉवचा कुत्रा किंवा ...... चा चिंपांझी नव्हे..... हे आम्हाला केंव्हा कळणार.

ती शिक्षिका त्या मुलीला तिची चूक दाखवून हे सांगू शकत होती की आता तुला पूर्ण मार्क्स दिले आहेत पण ही चूक सुधार.

हे कधीच शक्य नाही. बाई आणि मुलीची (वा इतरांच्या) आई काँपिटीशनमध्ये उतरल्या आहेत हो.... मार्क्स मिळाले ना, झालं मग. बाकी प्रश्नपद्धतीच चुकीची असली तर उत्तर बरोबर असून काय उपयोग.... मग काय, शिवाजीचा जन्म केंव्हा झाला, तर ३ ऱ्या वर्गात.  

अवांतर :- बी. एड. ला असतांना ती शिक्षिकाच काय कोणीही काहीही शिकत नाही... कारण चिंता इतकिच असते की नोकरी कधी लागणार, मग कसलं फत्र्याचं मानसशास्त्र अन कसलं काय. कदाचित त्या शिक्षिकेचे पाव मार्क्स कापले असतील तिच्या शिक्षिकेने  

विजय देशमुख

बी. एड. (प्रथम श्रेणी)