विवाहमाला अर्पण, लाजा होम आणि सप्तपदी हे तीन विवाहसंस्कार कायदेशीर मानले जातात. म्हणून ते विवाहसंस्कार मान्यवर साक्षीदारांच्या उपस्थितीनें केले जातात. तशीं छायाचित्रें काढतात व वधू पक्षाकडचे दोन, वरपक्षाकडचे दोन आणि पुरोहित असे पांच साक्षीदार ठेवले जातात. हे विवाहसंस्कार झाले नसल्यास तो विवाह मालमत्तेच्या तसेंच घटस्फोटाच्या खटल्यांत अग्राह्य ठरूं शकतो. म्हणून लवकरच नोंदणीहि करून घेतात. ही माहिती मला माझ्या विवाहाच्या वेळीं विवाह मंडळानें दिली होती. विवाह निबंधकाच्या कार्यांत देखील ही माहिती मिळते. हा नियम विवाहमंडळांत लावलेले विवाह तसेंच मंदिरांत वा आळंदीसारख्या ठिकाणीं लावलेले विवाह तसेंच सामुदायिक विवाह यांनाहि लागू होतो. सामुदायिक विवाह लावतांना बहुधा त्या त्या संस्था योग्य ती कायदेशीर काळजी घेतात.
जातां जातां अजून एक. विवाह जरी ग्राह्य धरला गेला नाहीं व पतीच्या वडिलोपार्जित संपत्तींत पत्नीला संपत्तीत हिस्सा मिळाला नाहीं तरी तिच्या संततीला मात्र मिळतो.
सुधीर कांदळकर