त्या वचनातील मध्ययुगीन हिंदी ही अंमळ आम्हा मराठीयांसाठी नेहमीप्रमाणे
उगाचच विनोदाचा विषय बनली. पण चित्रे नक्कीच वेधक होती. रांगेतल्या
मंडळींचा वेळ कारणी लागावा यासाठी त्या चित्रकाराने भलतेच कष्ट घेतले
होते.
आवडलें.
तेवढ्यात बम बम भोलेचा जोरदार गजर जाला नि 'साचलेली' गर्दी अचानक फुटली.
लोकांना अडवून बसलेल्या पोलिस मामांनी हिरवा झेंडा दाखवल्याने हा लोट पुढे
सरकला. उतारावरून घरंगळत ही गर्दी मंदिराच्या मुख्य इमारतीत झेपावली. तिथे
ठेवलेल्या धातूशोधक यंत्रातून पार होत आम्ही पुढे सरकलो.
छान धांवतें वर्णन. चित्र डोळ्यांसमोर उभें राहिलें.
सुधीर कांदळकर