बिनाकाची मैफल मस्त जमली आहे. संगीतावरून संगीतकार ओळखणें आवडलें. (पण कांहीं कांहीं गाणीं फसवतात बरें.) बिनाका गीतमालेइतकाच सुंदर लेख. मजा आली.
एखादा परिच्छेद अमीन सयानींबद्दल आला असता तर आवडले असतें. अमीन सयानीचा तो मधुर आवाज, त्याचें तें सुंदर हिंदी, तें खानदानी, श्रोत्यांचा सदैव सन्मान करणारें, मंत्रमुग्ध करणारें बोलणें, विसरूंच शकत नाहीं.
वाचतां वाचतां अनेक आठवणी जाग्या झाल्या. या अमीन सयानींचा मोठा भाऊ (ऐकीव माहिती) हमीद सयानी 'बोर्नव्हिटा क्वीझ कॉंटेस्ट' सादर करीत असे. हमीद गेल्यानंतर हा कार्यक्रम अमीन सादर करी असे. अमीनचें इंग्रजीही तेवढेंच उत्कृष्ट.आणि लोभसवाणें. हमीदचा तो रासवट पुरुषी आवाजाचा ठसा अमीनही पुसूं शकला नाहीं. आणि दुसऱ्या एका निवेदकाचें 'इन्स्पेक्टर ईगल' सुद्धां आठवतें आहे.
अशा एकेक आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर