वाहवा फारच छान.  त्याकाळी आमच्या ठाण्यातील नौपाडा भागात हॉटेले तर नव्हतीच पण रेडिओ सुद्धा फारच कमी. आमच्याकडे माझ्या वडिलांनी केलेला एक रेडिओ होता (अजूनही आहे) व बिनाका साठी चाळीतील सारे जण जमत त्यावेळच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. यावरून आठवले सारेगम ने बिनाका कार्यक्रमावर दोन सीडी काढल्या आहेत त्या जरूर ऐका. अमीनसाहेबांचा आवाज ऐकण्याचा आनंद पुन्हा एकदा घ्या.