आम्ही ९०-९४ मध्ये वसतीगृहात असतानाही बिनाका (सिबाका) गीतमाला ऐकत असू आणि त्यावेळी यारा सिलिसिली, हीना, दिल है के मानता नही इ. गाणी आणि अमीन सयानींचा आवाज ऐकून मजा यायची. इतकी वर्षं हा कार्यक्रम चालला होता हा विक्रमच असावा.
नंतर तो डी. डी. मेट्रोवर गेला आणि त्यातली मजा निघून गेली.
- कुमार
ता. क. पूर्वी किशोर कुमार, तलत, मुकेश यांनीही संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्यांतली कुठली गाणी बिनाकात आली हे माहिती नाही; पण किशोर कुमारची काही गाणी (उदा. झुमरू, आ चल के तुझे, ठंडी हवा, कोई हमदम इ. ) तरी आली असावीत असं वाटतं.