देव, देश आणि धर्म येथे हे वाचायला मिळाले:

भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर छत्रपति संभाजी राजांना औरंग्याने अत्यंत क्रुरपणे ठार मारले. राजांच्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन नदी काठावर व पाण्यात फेकुन देण्यात आले. खरे तर इतर वेळी दुनियाभरातील पापे करणारी पापी मंडळी आपले पाप प्रक्षलन करण्यासाठी अशा पवित्र नद्यांच्या संगमावर येतात. परंतु त्या नद्याच आज संभाजी महाराजांच्या देहाच्या मासाच्या फेकल्या गेलेल्या तुकड्यांनी रक्तांनी पावन झाल्या होत्या. आख्या महाराष्ट्राला पावन करणार्‍या या नद्यांनाच पावन करण्याची संधी या बलिदानाच्या निमित्ताने संभाजी राजांना जीवनाच्या शेवटाच्या क्षणी ...
पुढे वाचा. : जनाबाई