पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
झी टॉकिजच्या नटरंग या मराठी चित्रपटातील लावण्यांमुळे पुन्हा एकदा लावणीचा ठसका अनुभवायला मिळाला आहे. त्याबद्दल संगीतकार अजय-अतुल आणि गीतकार गुरु ठाकुर हे खरोखरच अभिनंदानास पात्र आहेत. आज शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, अप्सरा आली ही गाणी लोकप्रिय झाली आहेत. अनेकांच्या मोबाईलवर ही गाणी हमखास ऐकायला मिळतातच.