मस्तच झालाय लेख. या सर्व पेनांच्या प्रेमात माझेही अनेक दिवस कायमचे सोनेरी झाले आहेत. हीरो चं पेन तर किती जिवापाड जपलं होतं. शिवाय बाबांकडचं अस्सल पार्करचं पेनही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पंपामुळे लक्षात राहिलं आहे. बाबांची अनेक उत्तम पेनं मी मोडल्यामुळे हे पार्करचं पेन थेट शिक्षण संपल्यावरच हातात मिळालं होतं. 
पायलट पेन आणि बोर्डाची परीक्षा असं तर समीकरणच झालं होतं एके काळी. हल्ली पार्करची पेनं मिळतात का? 
पॉईंट फाईव्ह - पॉईंट सेव्हन वगरे मंडळींची आठवण झाल्यावर तर फारच छान वाटलं. कित्येक वर्षांत या जुन्या दोस्तांच्या आठवणीही पुसट झाल्या होत्या. मस्त वाटलं. आता घरी गेल्यावर एकदा कंपासपेटी काढून या सर्व साहित्याकडे डोळे भरून बघायला हवं.
धन्यवाद पल्लवी!

-- अदिती