छोटीशी गोष्ट मोठी कशी होते याची ती गोष्ट आहे.
मुळात वळू हा बिघडलेला नसतो. कोणालातरी तसे 'वाटते', आणि बातमी पसरते. वळू पिसाळल्याचे एकही दृश्य नाही. हळू हळू सर्वांनाच खात्री पटते की वळू पिसाळलेला आहे.
गावातले वातावरण उत्तम प्रकारे चित्रित केले गेले आहे. त्यातील काही प्रसंग/पात्रे (उदा. दिलीप प्रभावळकर) ही जरा अतिशयोक्ती वाटते, पण तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी दिग्दर्शक घेतातच.
गावातील एकुण वातावरण, राजकारण, स्थानिक राजकारण्यांपुढील वन अधिकार्याची हतबलता, जंगलीश्वापदे पकडण्याच्या त्याने वळूसाठी वापरलेल्या पद्धती, अशी कहाणी पुढे सरकते.
आणि या सर्वावरचा कळस म्हणजे वळू पकडला जाणे, हीच त्या चित्रपटातील पंचलाईन. वळू अत्यंत आरामात पकडून या सर्वातले वैयर्थ चित्रीत केलेले आहे. हा प्रसंग पाहून अनेकांना रहस्यकथेच्या शेवटी रसभंग झाल्याप्रमाणे वाटते, पण कोणते रहस्यच नसल्याने भंग होण्याचे कारणच नाही. हा प्रसंग पुर्ण चित्रपटात अगदी फिट्ट बसतो. बैल पकडला आहे वाघ नव्हे.
पुन्हा एकदा पाहा सिनेमा आवडेल कदाचित.