आपले थोडे चीनी अनुभवकथन मजेदार वाटले, विशेषतः सॉसपॅनच्या आवाजाची व बाळाच्या नावाची सांगड.... ते लोक आपल्या नावांचा कसा विचार करत असतील, हा विचार करून अजून गंमत वाटली....
मध्यंतरी एका चायनीज ब्लॉगवर एका पुस्तकातील मी लिहिलेल्या अनुभवाचे भाषांतर पाहण्यात आले. (त्यातील माझे नाव जसेच्या तसे ठेवल्याने ते गूगल सर्च मध्ये मिळाले! ) मग त्या पानावरील मजकुराला मी पुन्हा गूगलच्या मदतीने भाषांतरित केले. माझा अनुभव इंग्रजीतून चायनीजमध्ये व पुन्हा त्या भाषेतून इंग्रजीत भाषांतरित होताना त्यात जे काही घोर विनोदी बदल झाले होते ते वाचून मी घामाघूम होऊन ते पानच बंद करून टाकले!
तुमच्या ह्या कथनाने ती 'चायनीज' स्मृती जागृत झाली! :-)