पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मराठी-हिंदी मालिका किंवा चित्रपटांमधून खलनायक साकारणारा मिलिंद गुणाजी आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका हिंदी चित्रपटात ‘श्री साईबाबा’ साकारत आहे. लंडन येथील एस. सत्यप्रकाश यांची निर्मिती असलेला हा चित्रपट शिर्डीच्या साईबाबांवर आहे. एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार होणाऱ्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी साईबाबाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. खुद्द मिलिंद गुणाजी यांनीच ही माहिती दिली. अभिनेता म्हणून परिचित असलेल्या मिलिंदची खरी ओळख ही ट्रेकर- हायकर आणि भटकंतीकार म्हणून आहे. परंतु अभिनयाच्या क्षेत्रात येऊनही त्याने आपले निसर्ग, गड, किल्ले ...