पल्लवी, जमान्यापूर्वीच्या एका संस्मरणीय काळखंडाची आठवण पुन्हा जागली. 

एक असाही काळ तेव्हा होता ज्यावेळी बॉलपॉईंट पेनने लिहीणे अस्वीकारार्ह ठरवत असत.

मात्र नानासाहेब गोरे (ब्रिटनमधले आणीबाणीच्या काळातले उच्चायुक्त) यांची एक आठवण नेहमी चर्चिली जात असे. ती ही की त्यांच्या पेनाची निब ते पंचवीसहूनही जास्त वर्षे वापरत होते.

तशा प्रकारची दीर्घकाळ टिकून राहिलेली एकच गोष्ट माझ्याजवळ आज आहे. ती म्हणजे माझे घड्याळ. पहिल्या पगारातून १९८० साली घेतलेले त्यावेळचे गाजलेले "एच.एम.टी. अविनाश" घड्याळ मी आजही दिमाखात वापरत आहे.