आभासी वास्तव यातून तो जोर येत नाही, जो व्हर्च्युअल रिअॅलिटीमधून येतो.
पण तुमच्या आग्रहाचा आदर केला पाहिजे. 'आभासी वास्तव' हे शीर्षक चालेल.
अर्थातच, त्याहून अनुरूप शब्द मलाही सुचत नाहीत. अखेर भाषा ही एका पर्यावरणातून येते हे खरे. संगणकादी गोष्टी मराठी मातीत थोड्याच तयार झाल्या आहेत. स्वाभाविकच त्यात रुळलेले शब्द ते जिथल्या मातीतील आहेत, तेथीलच असणार. म्हणूनच मी लिहिताना 'व्हर्च्युअल रिअॅलिटी' असे लिहिले होते.