आता ह्यापुढे म्हणजे टॅक्सीचे रेल्वे स्टेशनच होणार की हो! म्हणजे मीटर टाकल्या टाकल्या टॅक्सीचालक तीन वेगवेगळ्या भाषांमधून तुम्हाला विचारेल, कुठं जायचंय म्हणून? तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तीन भाषांमधून उत्तरे येतील.
एक राष्ट्रभाषा, एक राज्यभाषा व एक व्यापारभाषा.... वाह! वाह!! ह्या बाबतीत पण मुंबई व मुंबईकर बाजी मारणार की हो भाऊ! आहेत
का भारतातील कोणत्या शहरात असे बहुभाषिक टॅक्सीचालक? चालू देत हो मुख्यमंत्री.... तुम्ही रोज नवनव्या घोषणांचा पाऊस पाडा आणि होणारा देखणा तमाशा पाहत बसा.... जय हो मुंबई!