मस्तच! पोळी प्रकरण वाचायचे राहून गेले होते. प्रवासीपंतांच्या उत्खननामुळे आज दिसले.

>सासुरवाशीण म्हणल्यावर कोणते तरी काम करणे आलेच.
या वाक्याची मजा वाटली. एकदम गप्पातले वाक्य आहे. तसा एकूण लेखच छान झाला आहे.

आजच एका इराकी-इंग्रज मैत्रिणीला फुलक्यांचे प्रात्यक्षिक दिले. ती आज रात्री फुलके करते म्हणाली आहे. पोळ्यांचे बहुतेक धर्मासारखे आहे. आपल्याला सारखे त्याविषयी बोलावेसे वाटते, प्रसार करावासा वाटतो.