वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
प्रसन्न सकाळ.. छान उन बिन पडलेलं. जास्त उकाडा नाही कि विशेष गारवा नाही अशी मोहक हवा. तो सकाळी नाश्ता वगैरे करून त्याच्या नेहमीच्या आवडत्या बागेत येऊन पोचला. चांगलं हिरवंगार, भरपूर सावली असलेलं आणि खाली चांगली हिरवळ असणारं झाड शोधून त्याखाली त्याने बैठक मांडली. आजूबाजूच्या रंगीबेरंगी फुलांचा मोहक गंध आणि छोट्या छोट्या पक्षांची गोड किलबिल कानांना, गात्रांना, मनाला सुखावत होती. निसर्गाचा आस्वाद घेता घेता तो नेहमीप्रमाणेच विचारांच्या राज्यात गढून गेला. त्याचं असं हे नेहमीच व्हायचं. कुठेही, कधीही. मनात नाना त-हेच्या आवडत्या विचारांची गर्दी झाली ...