हॅटस ऑफ पल्लवीसमीर.
खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी पण पेन्स, पेन्सिल्स, बॉलपेन्स आणि इतर अनेक गोष्टींबाबत फार हळवा आहे. "आठवणीतली पेन्स" असा एक लेख लिहिण्याचा विचार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्स चा तो वास, शाई भरताना घेतलेला शाईच्या बाटलीचा आणि शाईचा वास, काचेचे नाही तर प्लॅस्टिकचे ड्रॉपर्स, कापडावरचे ते निळे डाग, हाताला लागणारी शाई, नंतर ते डाग धुताना जीव जायचा.

किती किती गोष्टी आठवल्या आपला लेख वाचून.!
धन्यवाद...!