गाव सोडले तेव्हा गाव लोटले होते
सांग त्या जमान्याचे नाव कोठले होते.. वा खूप दिवसांनी एक नोसालगिक अनुभव देणारी, काळजाला भिडणारी रचना वाचायला मिळाली..
झाड झाड गावाचे केवढे बहरलेले
मी न पोचलो, माझे पत्र पोचले होते.. क्या बात है! बहोत खूब!
एक चिंच गाभुळली, एक पाडली कैरी
हे लहानपण, गावी हेच चोचले होते.. सुरेख
आई ह्या विषयावरील कुठलीही द्विपदी तर डोळ्यात पाणी आणते..
रोज सांज होताना एक शून्य जाणवते
काय लाभण्यासाठी काय सोसले होते.. एकदम मस्त लिहिले आहे
-मानस६