संस्कृतमध्ये व्योम म्हणजे आकाश, अवकाश, अंतरि(री)क्ष, अंतराळ वगैरे, पण विश्व नाही. व्योमक म्हणजे तर बुद्ध. पण तरी यांवरूम व्योमकेशीचा अर्थ लागत नाही.
व्योम हा शब्द संस्कृत धातू (१)वे (२)व्ये (३)वि+अव् यांच्यापैकी एकापासून झाला असला पाहिजे. धातूंचे अर्थ आच्छादणे असे काहीसे आहेत. ते आकाश किंवा अंतराळ या अर्थांशी जुळतात.
विश्व असा अर्थ नसल्याने व्योमकेशी म्हणजे विश्वव्यापी असणे संभवत नाही.