बिप्रशीश म्हणजे काय ब्राह्मणाचे डोके, की ब्राह्मणाचा आशीर्वाद? हा, आणि बिट्टू-बालाजी वगळता उरलेले  सर्व शब्द ज्यांना 'व' म्हणता येत नाहीत त्यांच्यासाठी ठीक आहेत. कानडीत बसव म्हणजे बैल. त्यामुळे त्या भाषेत बसवेश्वर म्हणजे पशुपति. (मराठीतला  वसू हा असाच संस्कृत वृष(भ)पासून आला . म्हणजे पोळ. त्याला गोवत्स हा अर्थ कसा आला कोण जाणे! ) बाकी ब्रिजित(विराजित?), बिरेन(वीरेंद्र? ), बिरजू , बिट्टू, विश्वजीत(जित?) --सर्व अपभ्रष्ट शब्द.
व्लादिमिर हा रशियन शब्द आवडला.  मराठीत घेण्यासारखा आहे.
गुजराथी जिग्‍नेशसारखा विघ्‍नेश वाटतो आहे. अर्थ, विघ्‍नांचा देव? व्यास हे आडनाव असते, त्यामुळे मुलाचे नांव म्हणून वापरण्यावर बंधने आली आहेत. बाकीची बहुतेक नावे लहान मुलाला शोभण्यासारखी नाहीत, ती उत्तरी  किंवा दाक्षिणात्य शास्त्री-पंडितांना योग्य आहेत.