नोंदणी विवाह म्हणजे एका छोट्याश्या खोलीत घामाघूम होणाऱ्या वधूवरांच्या गर्दीत  बसलेल्या  नोंदणी अधिकाऱ्यासमोर उभे राहून त्याच्या नोंदणी-पुस्तकात सह्या करणे. आणि वरती शुल्क भरणे. या कामाला दोन किंवा तीन मिनिटे पुरतात. ज्यांना विवाहाच्या गोड आठवणी वगैरे मनात साठवून ठेवायच्या नसतील त्यांनी हा प्रकार जरूर अनुभवावा. रजिस्ट्रारला जेवढे पैसे द्यावे लागतात तेवढ्या पैशात ब्राह्मणही तीन मिनिटात लग्न लावून देईल.