माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

पालघरमधल्या एका छोट्या गावात माझं आजोळ आहे. लहानपणीच्या दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत तिथे पडीक असतानाच्या कित्येक दुपारी आजीच्या सायीसारख्या मऊ मऊ हातांनी बनवलेली त्याहूनही मऊ अशी पानगीने तृप्त होऊन जात. आजीची पानगी आणि मामीने केलेला चहा असं आम्ही सगळी मावसभावंडं आणि मामेबहिणी वाड्यातल्या चिंचेच्या झाडाखाली ठेवलेल्या खाटांवर बसून गप्पा मारत घेत असू तेव्हाचा आजीचा चेहरा अजूनही डोळ्यापुढे येतो. एकेकाळी घरच्या म्हशीच्या दुधा-तुपाचे हंडे भरलेल्या गोकुळात आता आपल्या नातवंडांना चहा द्यावा लागतो याचा सल तिला असावा असं मला आता तिचा चेहरा ...
पुढे वाचा. : पानगी