आपला तर्क बरोबर वाटतो. तरीही, एवढी मंदिरे शहराच्या परिसरात असताना केवळे तेथेच वर्षानुवर्षे जाऊन विवाह करणे चमत्कारिक वाटते. आणखी एका प्रतिसादात आल्याप्रमाणे, पध्दतशीर विवाह लावून देण्याची यंत्रणा तेथे विकसित झाली असावी. शिवाय, शहरापासून दूर असल्याने आपली कार्टी पळून गेली आहेत हे आई-बापांच्या लक्षात येण्याआधीच आपला कार्यभाग उरकण्यासाठी आळंदीसारखे ठिकाण सोईचे ठरले असावे.