तुम्ही जो मुद्दा मांडला आहे तो अगदी बरोबर आहे. पण कितपत सगळ्यांना शक्य होईल ह्या बाबतीत शंका आहे.
१) मुळात सुनेच्या आई-वडिलांना सांभाळायला किती घरातील सासू-सासरे परवानगी देतील?
२) किती नवरे स्वतःहून आपल्या पत्नीला माहेरी काही हिस्सा मागू नकोस म्हणून सांगू शकतील? ( इतके चांगले सासू-सासरे आणि नवरा मिळायला किती जन्माच पुण्य हवं. )
३) फक्त आजारपणाचा ख्रर्च वाटून घेण्याचा प्रश्न असेल तर तो भावा-बहिणीने बसून चर्चा करूनच सोडवावा. मुलींनी भावाला आई-वडिलांच्या आजारपणासाठी खरंतर स्वतःहून आपलं कर्तव्य समजून मदत करायला हवी.
४) मला स्वतःला ३ नणंदा आहेत, त्यामुळे आमचा ३ वेग-वेगळ्या कुटुंबांबरोबर सतत संबंध येत असतो. तिन्ही कुटुंबे खुप चांगली आहेत; पण म्हणून काही ते कायमस्वरुपी सुनेच्या आई-वडिलांना सांभाळायला तयार होणार नाहित. अडि-अडचणीला मात्र स्वतःहून मदत करतात.
५) हि झाली एक बाजू; पण जे एकुलते एक असतील त्यांच काय? त्यांनी आजारी आई-वडिलांच काय करायच? (खर्चात कोणी वाटेकरी नाही म्हनून त्यांना एखाद्या व्रुद्धाश्रमात वा रस्त्यावर सोडून द्यायचं का?)
*********************************************************************
ख्ररं तर ज्या आई-वडिलांनि आपल्याल जन्म दिला, इतक चांगल शिक्षण दिलं, उत्तम संस्कार देऊन एक चांगली व्यक्ती बनवून जगायला लायक बनवले; अशा आई-वडिलांसाठी कितिही केल तरी कमीच असतं.
मान्य आहे कि आई-वडिलांनी मुलांना आणि सुनांना खुप त्रास दिल्याचीही काही उदाहरणे आहेत. पण म्हणून ते असहाय परीस्थित असताना आपण त्यांच्याशी कुस्केपणाने वागावे हे मला काही पटत नाहि.
ह्या विषयाचा आवाका खुप मोठा आहे. मला जे वाटलं ते मी इथे मांडलं. प्रत्येकांची ह्याविषयावरची मते वेगळी असणार.
पण फक्त कायद्यानेच सगळे प्रश्न सुटतात असे नाहि.............