मनोरंजनाचे दृष्टीने पाहू गेल्यास अनेकांना 'नटरंग' पसंत पडला आहे. समाजातील एका घटकाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी ह्या सिनेमाच्या निमित्ताने जरा जरी बदलली तरी ते ह्या चित्रपटाचे सार्थक असेल. जनसमूहाची मानसिकता, वर्षानुवर्षे चालत आलेल्या गैरसमजुती व कुचेष्टा करण्याची प्रवृती यांमुळे किती हानी होऊ शकते ह्याबद्दल जरी समाज अल्प प्रमाणात जागृत झाला तरी पैसा वसूल!