लेख ठीक आहे.
पण
काही प्रयोगांमध्ये त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही-
भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ते अचूकतेने घरी
परतले. असा एक समज आहे की ते त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट
(अक्षांश-रेखांश) लक्षात ठेवतात व त्यासाठी ते सूर्याच्या फिरण्याच्या
कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर
करतात.
प्रवास करताना ते खूपसे सरळ रेषेत
उडतात, जणू काही त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणाबद्दल आत्मविश्वास असतो.
त्यांचा मागोवा विमानाने केला गेला आहे व त्यातून असे निष्कर्ष काढले गेले
आहेत. घरी परतताना ते दिवसाच उडण्याचे पसंत करतात
या वाक्यांत कबूतर शब्द नपुंसकलिंगी आहे हे विसरल्यासारखे दिसते. ते कबूतर - ती कबुतरे.
वरील वाक्ये
काही प्रयोगांमध्ये त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही-
भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ती अचूकतेने घरी
परतली. असा एक समज आहे की ती त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट
(अक्षांश-रेखांश) लक्षात ठेवतात व त्यासाठी ती सूर्याच्या फिरण्याच्या
कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर
करतात.
प्रवास करताना ती खूपसे सरळ रेषेत
उडतात, जणू काही त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणाबद्दल आत्मविश्वास असतो.
त्यांचा मागोवा विमानाने केला गेला आहे व त्यातून असे निष्कर्ष काढले गेले
आहेत. घरी परतताना ती दिवसाच उडण्याचे पसंत करतात
अशी लिहावीत.
-श्री. सर. (दोन्ही)