औकाराची खूण' ौ 'अशी आहे. त्याअर्थी (दुसऱ्या?)कान्याला दोन्ही मात्रा चिकटल्या पाहिजेत हे नक्की. (पहिल्या कान्यासारख्या दिसणाऱ्या दांडीला स्वरदंड म्हणतात! )मराठीत वेगळा अौ असतो असे लेखात म्हटलेले नाही. घरी मराठी शिकवताना वेगळे शिकवले जाते असाच उल्लेख आहे. घरात सदोष शिकवले गेले तरी वर्गात झालेल्या चुकीबद्दल गुण न कापता समजावून सांगितले असते तरी भागले असते. त्याकरता एवढ्या जहाल प्रतिक्रियांची गरज़ नव्हती.
हिंदीत काही शब्द मराठीपेक्षा खरोखरच वेगळे लिहिले जातात. उदाहरणार्थ 'स्पोर्ट्स' हा शब्द. हिंदीत तो 'स्पोर्ट्स 'असा लिहिला जातो. कारण उघड आहे. वर्क्समध्ये जर 'स'वर रफार तर स्पोर्टसमध्ये का नको? शिवाय, हिंदीत हलन्त अक्षरावर रफार द्यायला मनाई आहे. (संस्कृतातले अर्ह् सारखे धातू हिंदीत लिहिताच येणार नाहीत! ) हिंदीतला स्पोट्र्स चुकीचा आहे असे नाही. पण त्याचा उच्चार स्पोर्टस असा होणे नैसर्गिक नाही.
भारत सरकारच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या फतव्याप्रमाण आता 'द' आणि तत्सम अक्षरांची जोडाक्षरे त्या अक्षरांचा पाय मोडूनच लिहिली पाहिजेत. म्हणजे बालोद्यान हा शब्द बालोद्यान असाच लिहिला पाहिजे. भले त्याचा अर्थ बालोद् नावाचे यान का होईना!
हिंदीत मराठीतला अर्धचंद्राकार अर्धा र नाही. री-रेकारान्त नामांची सामान्यरूपे करावी लागत नसल्याने त्यांना ऱ्ह, ऱ्य ही अक्षरे लागतच नाहीत. त्यामुळे सर्वच सरकारप्रणीत देवनागरी टंकांमध्ये चंद्राच्या कोरीसारख्या ' र् ' या खुणेची सोयच नसते. त्याच्याऐवजी ' -'(म्हणजे डॅश) वापरावा लागतो. साहजिकच डॅशपाशी शब्द तुटतो. दूरदर्शनवर मराठी लिहिलेले पाहताना हा डॅश आणि तुटलेले शब्द पाहणे रोज़चेच नशिबाला आले आहे.
ऍ हे अक्षरही हिंदीत नाही, तिथे ऐ ने काम भागते. फारच आग्रह झाला तर ए वर चन्द्र काढला की झाले. मुळात ऍ आणि ऑ हे उच्चार अनुक्रमे ए आणि ओ चे प्रकार आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे गुजराथीत स्नॅक्सला स्नेक्स, आणि हॉलला होल म्हणतात. हिंदीभाषी त्याहून वेगळे नाहीत बँकला बैंक आणि डॉक्टरला दाक्तर लिहिणारे अनेक हिंदीभाषक आहेत. हीच मंडळी भारत सरकरमध्ये बसून आपल्याला फर्मान सोडतात.
महाराष्ट्र सरकार नामर्द आणि दुबळे असल्यानेच आपल्यावर लादलेला हिंदी श, ल आणि ख आपण मुकाट्याने सहन करतो आहोत.---अद्वैतुल्लाखान