हा लेख काल वाचला. मग लक्षात आले की, ही लेख माला आहे. उद्या ती वाचायची असे ठरवूनच काल झोपलो होतो. आज सगळे लेख एका बैठकीत वाचले व ही प्रतिक्रिया देत आहे.
सहज, सोपी, ओघवती व सुंदर भाषाशैली यामुळे खूप आनंद झाला. लेखनाला अनुभवाची जोड असेल व वाचणाऱ्याला सगळे नीट कळावे अशी खरी तळमळ असेल तर हे सर्व गुण आपोआपच लेखनात उतरतात. इथे ते जाणवले.
सर्व लेख वाचताना ज्ञानेश्वरांच्या खालील ओव्यांची आठवण सतत येत होती.
१. मी जीव ऐसा संकल्प। करिता गेले कल्प। म्हणोनी प्राणी झाला अल्प। देहबुद्धीचा ॥ म्हणोनी सर्वांचे मूळ। ही कल्पनाची केवळ। तिचे करता निर्मूलन। ब्रह्मप्राप्ती ॥ -ज्ञानेश्वरी (येथे जीव म्हणजे व्यक्तिमत्त्व, देहबुद्धीचा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा आहारी गेलेला, ब्रह्म म्हणजे निराकार असे समजायचे)
२. निर्गुण निराकार । नाही ज्या आकार । जेथूनी चराचर । त्यासी भजे ॥ - हरिपाठ
३. मी तो कैसा । भानुप्रती जैसा । परी अज्ञानी जन । मज न वोळखती॥ (ह्या ओवीचे शब्द नीट आठवत नाही आहेत. पण आशय हाच आहे. येथे मी म्हणजे निराकार, भानुप्रती म्हणजे समोर दिसणाऱ्या सूर्यासारखा स्पष्ट) असो.
सर्व लेख वाचून खूप आनंद झाला.