उत्तीर्ण होणार नाहीस, अभ्यास चिक्कार केला तरी
तू मोक्ष कोड्यात फिरशील हा जन्मही पार केला तरी
उल्लेख वाचून गझलेत ती वाद घालायला भेटते
भरघोस मिळतो नफा रोज तोट्यात व्यापार केला तरी
थेंबा तुझी नोंद घेणार नाहीत कोणी प्रवाहामधे
धिक्कार केला तरी आणि त्यांना नमस्कार केला तरी
संबंध साऱ्या जगाशीच तोडून व्हावेस तू 'बेफिकिर'
गाजेल प्रत्येक मिसरा गझलचा, निराधार केला तरी ... विशेष आवडले. प्रत्येक गझलेत नवीन वृत्ताची योजना - धन्यवाद!