आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
गोष्ट क्रमवार न सांगता, काळाला झुगारून देणा-या तुकड्या तुकड्यांत सांगण्याचा किंवा दुस-या शब्दात सांगायचं तर नॉनलिनिअर स्टोरीटेलिंगचा प्रयोग तर आपल्याकडे युवा या चित्रपटाच्या निमित्ताने आला. पण कथा वेगळ्या स्वरुपात मांडण्याचे अनेक मार्ग अजूनही आपण पडताळून पाहण्यासारखे आहेत. या मार्गावरून बिनदिक्कत चालायची आपल्या दिग्दर्शकांची तयारी अजून नसली, तरी प्रेक्षकांनी हॉलीवूडचे चित्रपट पाहतापाहता हे नवे रस्ते ओळखीचे होतील, यात शंका नाही. अनरिलायबल नॅरेटर हा असाच एक कथामांडणीचा वेगळा प्रकार, माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे अजून तरी न आलेला. अर्थात ...
पुढे वाचा. : बेभरवशाचा निवेदक