ज्याप्रमाणे संपत्तीतील वाटा मिळणे हा कायद्याने मुलींचा हक्क आहे त्याच प्रमाणे आईवडीलांची देखभाल, शुश्रुषा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. कायदाच तसे सांगतो. त्याची जाणीव मुलींनी ठेवली पाहिजे. कष्टाने, श्रमाने आपली जबाबदारी पूर्ण पाडली पाहिजे.
अर्थात हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे. तसेच तत्कालीन परिस्थितीही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक घरी वेगवेगळा अनुभव येऊ शकतो.