वाईट एवढेच वाटते... कि हे सगळे समजून उमजून करण्याच्या गोष्टी आहेत.. त्याबद्दल असे उघड बोलावे लागत आहे..

खरे तर लग्न संस्था आणि त्यामुळे होणारे नातेसंबंध ह्यावर देखिल ह्या बाबी ठरतात... कारण लग्न झाल्यावर मुलींच्या जबाबदऱ्या बदलत जातात... परंतु मुलगी कमावती असेल तर  आईवडीलांची देखभाल करणे आवश्यक आहेच...

मुलीने सासरहून मदत मिळवून हे सर्व करावे असे अपेक्षित नसावे.. कारण समजा तिचे स्वतःचे असे काहीच नसेल तर मदत करणे थोडे अवघड जाऊ शकते परंतु सासरी सर्व काही उत्तम किंवा सुकाळ असेल आणि थोडीशी मदत केल्याने फार फरक पडणार नसेल तर मुलीने गरजा आणि आवश्यकता ह्यांचा मेळ घालून निर्णय घ्यावा......  

(अवघड विषयावरील वैयक्तिक मत आहे...चुक असल्यास सुधारून सांग़ावे..  कृपया चिरफाड नको)