माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:
सलग ४ महीने 'लडाख'वरील लिखाण पूर्ण केल्यानंतर महीनाभर ह्या ब्लॉगला थोडा आराम दिला होता. पण माझा आराम सुरू नव्हता. इतर ब्लोग्सवर 'सह्यभ्रमंती' आणि 'इतिहासा'वरील लिखाण सुरू होते. शिवाय 'खादाडी' चालू होतीच. तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी रिकामेपणा जाणवत होता. आपण सुरू केलेला कुठला ही ब्लॉग थंड पड़ता कामा नये असे सारखे वाटत होते. शेवटी २००८ साली नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये केलेल्या भटकंतीवर लिखाण करायचे ठरवून टाकले. पण बऱ्याच गोष्टी आठवत नव्हत्या तर काही अर्धवट आठवत होत्या. नेमकी त्या दिवशी रात्री उशिराने ऐश्वर्या 'रेघेवर सदृश्य' झाली. म्हणजे ...