प्रथिनांची पूड दुधात घालून रोज खाणे. दिवसातून ६ वेळा ठरवलेला आहार घेणे आणि रोज व्यायाम करणे. असे करून माझ्या एका मित्राचे मस्त ऍब्ज झाले आहेत. पण ते टिकवणेसुद्धा तितकेच अवघड आहे.
१. हो. फरक आहे. वजन कमी करण्यासाठी चालणे तर स्नायूंचा व्यायाम घडून ते मजबूत होण्यासाठी धावणे.
२. पहिले जास्त फायदेशीर. एका मर्यादेनंतर जास्ती वजने उचलणे तोट्याचे होऊ लागते. जर मल्ल व्हायचे असेल तरच त्या मार्गाने जावे. आपल्या गटातील वजन अधिकाधिक वेळा उचलण्याचा व्यायाम जास्त फायदेशीर.
३. मुख्यतः पायाचा व्यायाम होतो. पण पोट कमी होण्यासही मदत होते.