तुम्ही निवडलेल्या ओव्या आणि काढलेला अर्थ यावरुन तुम्हाला निराकार दिसलेला आहे.
आता मिस्टिसीझममध्ये (सुगंध येणे, प्रकाश दिसू लागणे, भविष्यकालीन घटनांचे वर्तमानात आकलन होणे, पूर्वजन्मीचे आठवणे, इथे बसून तिथे काय चालले आहे ते कळणे, शरीर तेज-पुंज होणे, चेहेऱ्यावर आभा येणे वगैरे) पडू नका.
सत्य सहज सोपे आणि सर्वाना सारखे उपलब्ध आहे. आपणच सत्य आहोत ही खूणगाठ बांधून जगा
तुम्हाला ओशोंचे एक सुरेख वाक्य सांगतो, ते म्हणाले होते : हमे सिद्ध होना नही है, हम स्वभावसेही सिद्ध है; बस, सिद्ध जैसा जीना है! (अष्टावक्र महागीता)
तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या ओव्या हव्या असतील तर त्या अशा आहेतः
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले,
तुझा तुची देव तुझा तुची भाव
फिटला संदेह, अन्यासक्ती!
तुमचा प्रतिसाद वाचून आनंद झाला. मी लगेच उत्तर लिहीले होते (२५/०१) पण बहुदा ते प्रतिसादाला लिंक करायला हवे होते त्यामुळे प्रशासकांशी संपर्क साधल्यावर उलगडा झाला
निराकाराचा बोध होणे हे पहिल्यांदा दुरापास्त आहे, पण झाल्यावर आपण मुळात निराकार आहोत ही धारणा ठेवून जगणे हे कौशल्याचे आहे.
ध्यान/धारणा/समाधी अश्या पातंजलींच्या (अष्टांगयोगातल्या) शेवटच्या तीन पायऱ्या आहेत. ध्यान याचा अर्थ जाणिवेचे आकाराकडून निराकाराकडे उन्मुख होणे, धारणा म्हणजे ती उन्मुखता टिकवणे आणि समाधी म्हणजे निराकाराला निराकाराचा बोध रात्रंदिवस असणे. चालू ठेवा!
संजय