आपला लेख वाचला. आपण जे कार्य करत आहात ते उत्तमच आहे, त्यात शंका नाही! नाडी ग्रंथांना जर विज्ञानाचे, शास्त्रशुद्ध संशोधनाचे अधिष्ठान मिळाले तर उत्तमच आहे. माझ्या परिचयात काही आर्किऑलॉजिस्ट व इंडॉलॉजिस्ट आहेत. हवी असल्यास मी त्यांची आपल्याशी गाठ/ संपर्क घालून देऊ शकते. मी स्वतः इंडॉलॉजीचा अभ्यास केला असल्यामुळे अनेकदा वरवर साध्या दिसणाऱ्या / भासणाऱ्या गोष्टींतही किती गूढ लपलेले असते ह्याची पुरेशी कल्पना आहे. पण माझी शंका ही की नाडीग्रंथ विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरविण्यास नाडीग्रंथ वाचणाऱ्यांचा विरोध/ निरुत्साह का? कदाचित आपण त्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगण्यास कमी पडतो की ते समजून घेण्यास कमी पडतात?

माझे स्वतःचे ३ वेगवेगळ्या नाडीग्रंथांतील ( २ अगस्त्यार नाडी - पण नाडी वाचणारे वेगळे, आणि १ शिवनाडी ) माझे नाव, आईवडीलांचे नाव, व्यवसाय, इतर कुटुंब तपशील बरोबर आले; परंतु तिन्हीमधील पूर्वजन्म कहाण्या वेगवेगळ्या, भविष्यकथन वेगवेगळे व उपायही वेगवेगळे, असे का असावे? एकदा त्यांना जन्मवेळ, स्थळ, दिनांक मिळाले की इतर भविष्यकथन करणाऱ्यांसारखेच तेही पत्रिका मांडून भविष्यकथन करीत नाहीत ना, अशी शंका वाटते.

मला आपल्याला मदत करायला नक्की आवडेल. आपले हे पोस्ट मी उशीरा वाचत आहे. पण तरी जर आपण व्यक्तिगत निरोप ठेवलात तरी चालेल. खास करून नाडी ग्रंथ वाचणे व वैखरी खेरीज इतर वाणी (परा, पश्यंती, मध्यमा) जाणण्याची/ ऐकण्याचे कौशल्य/ शक्ती यांचा संबंध आहे काय, तसेच ज्या काव्यात ह्या ग्रंथांची रचना झाली आहे ती काव्ये, काव्यपद्धती, वृत्ते, व्याकरण तेवढेच पुराणे आहे काय.... वापरलेले शब्द तितकेच प्राचीन आहेत काय.... नाडीची जी पत्रे आहेत त्यांचा कार्बन डेटिंग ऍनॅलिसिस काय सांगतो? त्यावर ज्या शाईने लिहिले आहे तिचे पृथःकरण झाले आहे काय? लिखाणवट, शैली काय सांगते? समास, परिच्छेद आहेत का? आकडे काय सांगतात? आकड्यांचा इतिहासही मग तेवढाच पुराणा समजायचा का? त्यात अभिवादन केलेल्या देवीदेवतांचा उल्लेख काय सांगतो? उपायात सुचवलेली द्रव्ये, औषधी ह्यांचा आयुर्वेदाशी कसा संबंध लागतो? इत्यादी इत्यादी ह्याविषयी जाणावयास मलाही खूप आवडेल..... करण्यासारखे खूप आहे.

आपण करत आहात त्या ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा! त्यातून उत्तम काही सर्वांना मिळो हीच सदिच्छा!

अरुंधती कुलकर्णी

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. १