विदर्भात काहीतरी चांगले होत असल्याचा आनंद वाटला.

कृषी खात्याचे मुख्य कार्य, कृषी क्षेत्रात असलेल्या अडचणी कमी करणे व अधिकाधिक धान्य, बी-बियाणे, रसायने वगैरे उपलब्ध करून देणे तसेच बाजारभाव स्थिर राहतील असे कार्य करणे असावे. (चूभूद्याघ्या).

१. कांद्याचा भाव वाढल्यावर महिन्याभराने कांदा आयात करणे. किंवा भाव कोसळल्यावर महिन्यानंतर निर्यातीचा निर्णय घेणे, इतका मूर्खपणा नेहमी का होतो?

२. आधी कापसाला भाव द्यायचा नाही, कापूस नाईलाजाने व्यापाऱ्याला विकल्यावर भाव देणे, ही नाटकं कोण करतं?

३. शेती नेहमी तोट्यातच का जाते? मग गब्बर शेतकरी/ राजकारणी कसे काय बनतात, तर इतरांना आत्महत्या करावी लागते? कृषी मंत्र्यांना यासाठी मुहूर्त बघावा लागेल का?

४. आज ८०- १०० रुपयाने मिळणारी डाळ, नवीन डाळ आल्यावर ४० पर्यंत उतरेल, फायदा कोणाचा? व्यापारी वर्गाचा.... नुकसान शेतकऱ्यांचे.... हे सगळं कृषी मंत्री टाळु शकतात पण त्यांना मलई कशी मिळेल मग?