चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
झेन्ग कुटुंब हे बिजिंगमधे रहाणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. या कुटुंबात, झेन्ग पती-पत्नी, श्रीयुत झेन्ग यांचे वरिष्ठ नागरिक असलेले आई-वडील व जवळच्याच अपार्टमेंट ब्लॉकमधे रहाणारे श्रीमती झेन्ग यांचे आई-वडील एवढेच सभासद आहेत. झेन्ग पती-पत्नीना, मेंगमेंग या नावाचा एक अतिशय गोड मुलगा आहे. मेंगमेंगचे वय आहे एक महिना पूर्ण. झेन्ग पती-पत्नीना मेंगमेंगचा एक महिन्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे. या पार्टीला कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे? या विषयावर सध्या झेन्ग कुटुंबात सतत चर्चा चालू आहे. नातेवाईक, मित्र यांची यादी करताना, ज्या कुटुंबात नवजात मुलगी ...