उत्खनन :

स्तोत्रामध्ये बुध ग्रहाचे वर्णन प्रियंगुकलिकाश्यामम् असे आहे. सदर भाषांतरात प्रियंगू ह्या वनस्पतीचे नाव गव्हला, ब्लॅक मस्टर्ड असे दिलेले आहे.वाल्मीकिरामायणाच्या सुंदरकांडात अशोकवनातल्या अनेक वृक्षांची नावे आहेत.त्यातल्या प्रियंगू ह्या नावासाठी पं‌. सातवळेकरांनी आपल्या मराठी अनुवादात वाघंटी हे नाव वापरलेले आहे. वाघंटीच्या फुलांचा रंग हा साधारणतः लाजाळूच्या फुलांप्रमाणे काळसर गुलाबी-जांभळट असतो, अशी माहिती मिळाली होती.