बेफिकीर, इतक्या विस्तृत, सुंदर आणि मुद्देसुद विवेचना बद्दल आभार (आणि ही औपचारीकता नाही). मी तुमचे मत मागितले आणि तुम्ही ते प्रांजळपणे दिलेत ह्याचा खरंच आनंद झाला. तुम्ही दाखवलेल्या त्रुटी योग्यच आहेत. नाही मधला 'ही' ऱ्हस्वच हवा. 'द्यु' ही माझी टायपिंग मिस्टेक होती. तसे सारेच आक्षेप मान्य. वृत्त, रदिफ, काफियाचे नियम आणि आधुनिक गजल रचनाकारांकडूनच्या अपेक्षा सर्व विचार करण्यायोग्यच आहे. पुढील लिखाणात मी स्वतः तर त्यांचा नक्कीच विचार करेन. श्री. जावडेकर, वाघमारे, फणसे, कांदळकर, तुमचेही आभार. लोभ असावा.