घटस्फोट हा शब्द संस्कृत भाषेमध्येही विवाहविच्छेद या अर्थानेच वापरला गेला आहे काय? संस्कृतोद्भव इतर भाषांमध्ये काय परिस्थिती आहे? गुजराती मध्ये छूटाछेड किंवा छूटाछेडा म्हणतात. काही  जमातींमध्ये जातपंचायतीसमोर लग्न किंवा फारकतीचे निर्णय होतात तिथे काडीमोड,सोडचिट्ठी हे शब्द प्रामुख्याने वापरले जातात. प्रत्यक्ष काडी मोडणे ही एक प्रतीकात्मक प्रथा आहे असेही समजले. फारकतीच्यावेळच्या देवाणघेवाणीविषयीचे कागद-दस्त-ऐवज म्हणजे सोडचिट्ठी.