१. रुग्णालय, औषधें यांच्या बिलांबरोबर श्रमांचेंही योग्य मूल्यमापन केलें पाहिजे. माझ्या आईच्या शेवटच्या आजारांत चारेक दिवस माझ्या धाकट्या वहिनीनें शुश्रुषा केली होती त्याचें आर्थिक मूल्यमापन मीं माझ्या भावंडांना विचारांत घ्यायला लावलें होतें. एका खासगी नर्सचें दररोज दोन शिफ्टचें त्या रुग्णालयातलें वेतन हें प्रमाण मानलें होतें. आजारपण लांबल्यास ही रक्कम प्रचंड होऊं शकते.
२. आईवडिलांना आर्थिक उत्पन्न नसल्यास, त्यांचे घरभाडें, घरदुरुस्तीचा खर्च, आणि इतर कांहीं खर्च असल्यास तोही मुलांमुलींनीं समप्रमाणांत सोसायचा असतो.
परिजा यांनी वर
मुळात सुनेच्या आई-वडिलांना सांभाळायला किती घरातील सासू-सासरे परवानगी देतील?
हा मुद्दा मांडला आहे. तो अगदीं उचित आहे. एवढा व्यापक विचार आपल्याला करायलाच पाहिजे. खरें तर यापुढें सेवानिवृत्त होणारांनीं व नुकत्याच झालेल्यांनीं - यांत मीही आलोंच - आपल्या वार्धक्यातल्या चरितार्थाची आर्थिक सोय अगोदरच करून वृद्धाश्रमांत राहायची मानसिक तयारी ठेवायला पाहिजे. तरच हा प्रश्न निदान पुढील पिढीला पडणार नाहीं.
सुधीर कांदळकर.