साबणाची आठवण झाली.. मी चौथीत वगैरे असताना आमच्या घरी मोठ्या कौतुकाने तो आणला होता.. साबणवडी कशीबशी संपली.. खरच बरेच दिवस टिकत असावा.. छान होता.. साबणाचा चिखल होत नसे.. पण वडी लवकर न संपल्याने बोर व्हायचे .. अनेक दिवस तोच तोच वापरून. शिवाय मी ही एक पिसापिसांची टोपी कुठूनतरी आणल्याचे स्मरते आहे :)..

<<सगळ्या मुली एकजात चुपचाप डोकी खाली घालून ओणव्या झालेल्या. त्या त्या रस्त्यांपुरती गाणी नाहीत, भेंड्या नाहीत की गप्पा नाहीत. सर्व कसं शांत. तरीही एखादा दगड भिरभिरत यायचाच बसच्या रोखाने! एकदा पुढच्या एका खिडकीच्या काचेला तडा गेला, पण कोणाला इजा झाली नाही. एकदा एक जमाव मागे लागला, पण बसचालकाच्या कौशल्यामुळे वाचलो.>>
- अशा गंभीर परिस्थितीत तुम्हाला सहल अयोजकानी एकाच ठिकाणी थांबवायला हवे होते आणि जरासे शांत वाटल्यावर तडक पुण्याला निघायला पाहिजे होते.. कशाला उगाच वाटेत मड्गाव बिडगाव ला अणी बीचेस ना तरी फिरत बसायचं? फट म्हणता काही झालं असतं म्हणजे याची राहून राहून काळजी वाटत होती लेख वाचताना ..