@ भास्कर : मडगावच्या बाजारात मला ज्यूटच्या पिशव्याही दिसल्या व गोल्डफिशचा
साबणसुद्धा! भराभर, सावध चित्ताने, कसलीही घासाघीस करण्याच्या भानगडीत न
पडता त्यांची खरेदी केली.
@पल्लवीसमीर : हो गं, मी खरेदी केलेला गोल्डफिश आमच्याकडे सुद्धा खूप खूप दिवस टिकला.... इतका, की अगदी कंटाळा यायचा त्याला रोज रोज बेसिनवर टांगलेला पाहून....
तू म्हणतेस ते खरंय.... सहल आयोजकांनी एकाच ठिकाणी थांबायला हवं होतं.... पण जरा विचार कर... १५ - १६ वयाच्या सुमारे ५५ मुली... अपरिमित उत्साह, आणि त्या सहल आयोजक काकांच्या मागे आम्ही गोवा पाहायचा लावलेला धोशा... त्यांनी आम्हाला कमीत कमी त्रास होईल ह्याचा खूप प्रयत्न केला. शिवाय त्यांना व्यवहारही पाहायचा होता.... कदाचित सहलीचे पैसे परत द्यायला लागतील हीसुद्धा भीती असावी त्यांना... पण तरीही त्यांनी कमालीची सावधानता दाखवली हे खरे! आज वाटते की हो, त्यांनी तेव्हा सरळ परत पुण्याला यायला हवे होते... पण त्या परिस्थितीत ते कशाकशाला सामोरे गेले असतील कोणास ठाऊक!