अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


मध्यंतरी, अमेरिकेला स्थायिक असलेले माझे एक स्नेही, भारत भेटीसाठी आले होते. मागच्या वेळेस ते भारतात आले होते त्याला जवळ जवळ दहा वर्षे तरी उलटून गेली असावीत. ते आल्यामुळे, आम्ही काही जुने मित्र त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करत बसलो होतो. त्यांना सहज कोणीतरी विचारले की मागच्या दहा वर्षात त्यांना भारतात सर्वात मोठा असा कोणता फरक जाणवला? मला वाटले होते की ते बराच विचार करून उत्तर देतील. पण त्यांना क्षणाचाही वेळ उत्तर द्यायला लागला नाही कारण त्यांना अगदी विमानतळावर उतरल्यापासूनच हा फरक जाणवला होता. हा फरक होता मोबाईल फोन्सचा भारतात आता ...
पुढे वाचा. : हलती -फिरती क्रांती