पण अशा विषयावर चर्चा करावी लागते हे कोणाचे दुर्दैव आहे समजत नाही. खरंतर वारसाहक्कात हिस्सा असो किंवा नाही पण आई- वडिलांच्या सेवेत मुलींनी मदत केलीच पाहिजे.
सासरचे लोक मदत करू देतील की नाही हा मुद्दाही तितकाच खरा आहे. असे सासरचे लोक बघितले आहेत. आम्हा बहिणींमध्येच एकीच्या सासरच्या लोकांचा आम्हाला असा अनुभव आला आहे.
माझ्या भावाला आम्ही दोघी बहिणी शिक्षणासाठी मदत करतो. त्याचे शिक्षण वडिलांना अशक्य नाही पण थोडे अवघड होत आहे हे लक्षात घेवून आम्ही दोघी बहिणींनी त्याला महिन्याला पैसे पाठवायचे ठरवले. आमच्या सासरी कोणीही काही हरकत घेतली नाही. पण माझ्या तिसऱ्या बहिणीच्या सासरच्यांनी मदत करायचे नाकारले. म्हणे आता माहेरचा काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही घरातच असे उदाहरण पाहिले आहे. पण त्याचबरोबर आमच्या सासरचे मदतीला हसतमुखाने तयार झाले. आणि आमच्या माहेरकडून वारसाहक्काने आम्हाला काही मिळणार नाही हे माहित आहे सासरच्या लोकांना. आणि त्यांची कसलीही अपेक्षाही नाही. त्यामुळे असे चांगले लोकही आम्ही पाहिले आहेत.