चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
ग्वांगडॉंग(Guangdong) हा चीनमधे अगदी दक्षिणेला असलेला प्रांत आहे. या प्रांतातल्या लिऍंगचिऍओ(Liangqiao) या शहराच्या दक्षिणेला शांगबा(Shangba) नावाचे अंदाजे 3300 वस्तीचे एक खेडेगाव आहे. प्रथमदर्शनी हे गावे म्हणजे ऊस आणि तांदुळाच्या शेतांमधे लपलेले एक छानसे खेडेगाव वाटते. परंतु आज हे गाव कर्करोगींचे गाव या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे.
1987 पासून या गावातले 250 तरी गावकरी कर्करोगाचे शिकार बनले आहेत. गावात होणार्या मृत्युपैकी 80 टक्के तरी मृत्यु, जठर किंवा पचनसंस्थेच्या कर्करोगाला बळी पडलेले आहेत. या शिवाय या गावातले बहुसंख्य लोक, ...
पुढे वाचा. : कर्करोगींचे गाव