सुनील,
मलाही आकाशदर्शनाची खूप आवड आहे. सध्या माझ्याकडे मर्क्युरी ची डिजीटल कॅमेरा असलेली द्विनेत्री आहे जी मला दिवसा दूरच्या वस्तू आणि रात्री आकाश दर्शन या दोन्ही साठी उपयोगी पडते.
वरदा म्हणतात ते बरोबर आहे. टेलिस्कोप मधून उलटे दिसते. ती एकनेत्री असते आणि विशिष्ट ग्रह ताऱ्यावर स्थिर करून त्यातून बघावे लागते. त्यासाठी ट्रायपॉड ही लागतो.
द्विनेत्री अर्थात बायनॉक्युलर मधून सुलटे दिसते त्यामुळे एखादी शक्तीशाली द्विनेत्री दोन्हीसाठी वापरता येईल. विशेषतः चंद्रावरील खड्डे, तारकागुच्छ , मेसीयर ऑब्जेक्टस छान दिसतील.
शुक्राची कला, गुरूचे उपग्रह , शनीची कडी इ. सुद्धा दिसू शकेल पण त्यासाठी टेलिस्कोपच बरी.
मुंबईत गिरगावला तेजराज आणि कंपनी येथे उत्तम दर्जाच्या दुर्बिणी मिळतील. मी स्वतः तिथे जाऊन दुर्बिणी आणि इतर काही वस्तू पाहून आलो आहे. त्यांचे संकेतस्थळही आहे. जे खाली दिले आहे. त्यावर अधिक माहिती मिळू शकेल.
हे वरळीच्या नेहरू प्लॅनेटेरियमलाही दुर्बिणी पुरवतात.
प्लॅनेटेरियमच्या दुकानातही दुर्बिणी मिळतात. त्या कदाचित अधिक महाग असतील.
कळावे,
- मंदार