राष्ट्रभाषेची दोन प्रमुख कार्ये ही माझ्यामते व्यवहारात सुसूत्रता व समानता आणणे अशी असावीत. यातला एक थेट व्यावहारिक(आणि चावून चोथा झालेला) मुद्दा असा आहे की मोडके तोडके हिंदी बोलणाऱ्या/लिहिणाऱ्यांवर शुद्ध हिंदी लिहिणारे/बोलणारे लोक सहज कुरघोडी करू शकतात/करतात‌. शुद्ध इंग्रजी बोलणारे/लिहिणारे अगदी विरळ किंवा विरळा आहेत. तसे शुद्ध हिंदी लिहू/बोलू शकणाऱ्यांचे नाही. ते संख्येने जास्त आहेत आणि भाषेच्या जोरावर आपला एकाधिकार प्रस्थापित करू शकतात. भारतीय वस्तुस्थिती पहाता इंग्रजी जाणणाऱ्यांपैकी बहुतेक सर्वच मोडके तोडके इंग्रजी बोलतात/लिहितात.सर्वच लंगडे असल्यामुळे धावताना अथवा शर्यत जिंकताना सर्वांना समान संधी असते.

इंग्रजी भाषेमुळे समानता येण्यास काही अंशी मदत होऊ शकते हा मुद्दा इतरत्रही मांडला गेला आहे.